Sunday, July 24, 2011

टोमॅटो सूप















साहित्य - सहा टोमॅटो उकडून, साखर, मीठ, मिरपूड, खवलेला नारळ, लसूण, कांदा (उभा चिरुन), कोथिंबीर, बटर

प्रथम टोमॅटो कुकर कध्ये उकडून घ्यावेत. नंतर ते मिक्सर मध्ये फिरवून ते गॅसवर उकळायला ठेवावे. त्यात चवीप्रमाणे साखर मीठ आणि मिरपूड घालावी. खवलेला नारळ मिक्सर कध्ये बारिक करुन घालावा. थोडा लसूण घेउन त्याचे बारिक तुकडे करावेत. ते तेलावर गुलाबी रंगाचे होई पर्यंत परतून घ्यावेत व ते सूप मध्ये घालावेत. उभा चिरलेला कांदा तेलावर थोडासा डार्क ब्राउन कलरवर परतून घ्यावा. थोडासा जळाला तरी चालेल. सूपवर परतलेला कांदा आणि बटर घालून सर्व्ह करावे. तळलेल्या कांद्या ऐवजी तळलेले नुडल्स सुध्दा चालतील.

2 comments:

  1. काल कौस्तुभने बनवलेले हे सूप खूप भारी.त्याला करताना बघताना मला मजा आली. म्हणजे सोललेल्या लसणाचे ओट्यावर एकदम बारीक तुकडे करताना किंवा उभा चिरलेला कांदा हाताने घोळून मोकळा करुन घेऊन मगच तेलात खरपूस तळताना.....कौस्तुभ खूप भारी. तू आणि तुझ्या हातचे सूप.

    ReplyDelete
  2. वा!! मस्तच - कौस्तुभची पाककॄती आणि दीपाची टिप्पणी दोन्हीही :)

    ReplyDelete