Thursday, February 16, 2012

झटपट चीसॅप

झटपट चीज सॅन्डविच पराठा





सुट्टीच्या दिवशी सकाळी खायला काय करावं? हा एक प्रश्नच असतो. आमच्यासारखे जे आधीपासून नियोजन करत नाहीत, त्यांना तर फारच!
अशावेळी घरात असणार्‍या साहित्यातून हा बनवता येतो.

साहित्य -- कणीक, तेल, मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, बटर/लोणी, चीज
कृती -- थोडे जिरे तव्यावर भाजून त्याची पोळपाटावर पूड करावी. ती कणकेत घालावी, मीठ, तेल, मिरचीचे बारीक तुकडे आणि भरपूर कोथिंबीर घालून कणीक मळावी.
कणकेचे दोन समान आकारचे, पोळीपेक्षा लहान, गोळे करून घ्यावेत. त्याच्या दोन पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात, एका पोळीवर भरपूर किसलेले चीज पसरावे, दुसरी पोळी त्यावर पसरून हाताने किंचित दाब द्यावा. हा तयार झालेला पराठा, बटर/लोणी घालून खमंग भाजून घ्यावा. लिंबाच्या, कैरीच्या किंवा कुठल्याही लोणच्या किंवा सॉसबरोबर खावा.

असं केल्याने काय होतं? भरपूर नाष्टा झाल्याने पुन्हा लगेच कोणी चिवचिवत आपल्या आजूबाजूला येत नाही, निवांत पेपर वाचता येतो, दुपारच्या जेवणासाठी काही साधंसोपं केलं तरी चालतं, पराठ्याची कृती जिव्हाळावर टाकायला वेळ मिळतो.

4 comments:

  1. भरपूर नाष्टा झाल्याने पुन्हा लगेच कोणी चिवचिवत आपल्या आजूबाजूला येत नाही????

    आई ssss भूक !

    - मुक्ता

    ReplyDelete
  2. एकदम भारी !! आम्हाला पण अशा झटपट पाककृती (खायला) फ़ारच आवडतात :)

    आणि शेवटचं वाक्य खास सचिनसाठी, हो ना गं विद्या?

    ReplyDelete
  3. विद्या तुझं काही खरं नाही.वॉलनट केक, चीसॅप.....चालू द्यात.

    ReplyDelete
  4. Khupach chhan i will definitely try this..... and surely will leave a reply.....

    ReplyDelete