पालक कढईत शिजवणे. (थोडा अर्धवट)
मिक्सर मधून बारीक करणे.
लोण्याची फोडणी करणे. (घरगुती अमूल नाही). त्यामधे मेथ्या टाकून वाटलेले पालक घालणे.
(फोडणीचे इतर साहित्या घालू नये)
सोबत आलं-लसूण पेस्ट, वाटलेली मिरची (तिखट जितके हवे तितकी), २-३ चमचे दही, चवीप्रमाणे मीठ घालून शिजवणे. पनीस असल्यास जरुर घालावे. (पनीर नुसते तुकडे टाकले किंवा आधी बटरवर परतून मग टाकले तरी चालतात.)
* नेहमीची भाजी खाऊन काहीवेळा कंटाळा येतॊ त्यामुळे अशी भाजी जरुर करुन पहावी.
वैशाली,
ReplyDeleteपुढच्यावेळी अशी भाजी केलीस की त्याचा फोटो काढून इथे टाक.
वैशाली,
ReplyDeleteपुढच्यावेळी अशी भाजी केलीस की डबा पाठव / घरी बोलव.
आजच सकाळी पालकाची वैशालीप्रमाणे भाजी करायची ठरवली. कौस्तुभ कॉम्प्यूटरवर होताच तर मी त्याला पालकाची भाजी काढ म्हणाले आज वैशाली प्रमाणे करुन बघते. तर तो म्हणाला अग पण तिने लिहीलय. नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आला तर.............वैशाली मी नक्की तुझ्या पद्धतीने भाजी करुन बघीन.मला नेहमीच्या पद्धतीने केलेली भाजी खाऊन कंटाळा येईपर्यंत नाही वाट बघणार.
ReplyDelete