
दुधी भोपळ्याची भाजी.
१)मूठभर हरभरा डाळ भिजत टाकावी.
२) दुधी भोपळ्याच्या चौकोनी फोडी कराव्यात.
३) कढईत फोडणी करुन, त्यात भिजलेली डाळ नि मिरच्यांचे तुकडे एकत्र परतावेत.
४) आता त्यात भोपळ्याच्या फोडी टाकाव्यात. परतुन झाकण ठेवावे. एक वाफ आल्यानंतर थोडेसे मीठ नि साखर टाकावी. भाजी शिजल्यावर तीत खोबरे, कोथिंबीर घालावी.
व्वा! जगदीश कधी येऊ. फक्त सांग.
ReplyDeleteवा!
ReplyDeleteअशी भाजी करून झाली की सोबत टोमॅटोची कोशिंबीर करावी..
आणि एखाद्या मैत्रिणीला घरी जेवायला बोलवावे.
जगदीश,
ReplyDeleteछान !!
आता विद्याधीश-वेदात्मन रोज मागे लागणार तूच डबा बनवावास म्हणून :)
ती टॉमेटो-काकडी कोशिंबिरीची कॄती सुध्दा येऊन जाऊ दे.