मोदकाच्या पारीसाठी साहीत्य- डाळीचे पीठ १ वाटी,तिखट, मीठ, हींग, हळद.डाळीच्या पीठात सांगितलेले साहीत्य घालून थोड्या पाण्यात तेलाचा हात लावून घट्ट गोळा करणे.
सारणासाठी-सुके खोबरे कीसलेले( सुक्या खोब-याची अर्धी वाटी),खसखस १ चमचा भाजून बारीक केलेली,तिखट-मीठ चवीप्रमाणे,बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर साखर.हे मिश्रण एकत्र करावे.
पारीसाठीचे भिजवलेले पीठ पुरीपेक्षाही निम्मी लाटी घेऊन त्याची उकडीचे मोदक भरुन घेतो तश्या पद्धतीने तयार सारण भरुन छोटे छोटे मोदक यार करुन घ्यावेत.
ग्रेव्हीसाठी-कांदा एक उभा चिरुन,खोबरे कीसलेले अर्धीवाटी,शेंगदाणे अर्धी वाटी, लसूण ५ ते ६ पाकळ्या, तीळ अर्धी वाटी.सर्व साहीत्य एकएक करुन तेलावर परतून घ्या. व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करा.
पातेल्यात फोडणीसाठी तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करा. नंतर ही वाटलेली पेस्ट चांगली परतून घ्या. नंतर त्यात आपल्याला हवे तेवढे सरसरीत होण्यासाठी पाणी घाला. त्यात मीठ तिखट चवीप्रमाणे घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हा रस्सा चांगला उकळल्यावर त्यात वरील मोदक सोडा. गॅस बारीक करुन ५ मिनीटे हे मोदक शिजू द्या.अशी मोदकाची आमटी, गरम गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा,आणि लसणाची ओली पाट्यावर वाटलेली चटणी अशी सर्व्ह करावी.
दीपा,
ReplyDeleteवा!! एकदम खास पदार्थ आहे हा.
कधी बोलावतेस विद्याला..... फ़ोटोसाठी? :)
आशाला अनुमोदन!
ReplyDelete