Tuesday, August 2, 2011

कारल्याची भाजी

पाव किलो कारली, तेल- ६ टेबल स्पून, फोडणीच साहित्य, सुक खोबरं किसलेलं- पाऊण वाटी, दाण्याचा कुट - चार टेबल स्पून, मिरची, चिंचेचा कोळ/सॉस, गूळ, मीठ

कारली आयताकार तुकडे (छोटे) करुन चिरणे. (बिया काढून टाकणे). कढईमधे पाणी घेणे, त्यामधे हळद व मीठ टाकणे व कारल्याचे तुकडे टाकून ते उकळून घेणे. तुकडे बोटाने मोडले जातील इतपत शिजवणे. त्यानंतर चाळणीतून गाळणे व परत दाबून पाणी काढणे म्हणजे कडूपणा कमी येतो. फोडणी करणे, मिरची टाकणे - शिजवलेली कारली टाकणे - त्यावर तिखट पण टाकणे (रंग छान येतॊ) मीठ, सुक खोबरं, कुट, चिंच, गूळ टाकून भाजी परतावी. ती शिजलीच असते फक्त अजून खमंग करावी. भाजी तय्यार.

* इथे चिंच, गूळ, मीठ ह्याच्याप्रमाणाचा उल्लेख केला नाही कारण ते सर्वांना माहीत असेल असे ग्रुहित धरले आहे.
* एकंदरीतच मुबलक प्रमाणात तेल, खोबरं, कुट आहे ह्याचा विचार करता तब्येत आणि जिभेची चोचले ह्याची सांगड कशी घालायची आणि त्याची वारंवारिता किती ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

1 comment: