Sunday, August 14, 2011

गूळभात



साहित्य - १ वाटी तांदूळ, १ वाटी गूळ, १ वाटी नारळाचा किस, तीन चमचे साजूक तूप, दोन लवंगा, दोन चिमूट वेलदोड्याची पूड, १० काजू.
वेळ -३५  मिनिटे ,
किती जणांसाठी? - ४ ते ५ माणसांसाठी
कृती -
१) तांदूळ धुवून घ्यावेत, १ वाटी तांदळासाठी ( कोलम) १वाटी पाणी घालावे. कुकरमधे दुसर्‍या डब्यात नारळाचा किस ठेवावा. भात शिजवून घ्यावा.
२) भात ताटात/ परातीत काढून पसरवावा. त्यावर एक चमचा तूप घालावे.
३) कढईत दोन चमचे तूप घालावे. तूप कडकडीत झाल्यावर त्यात दोन लवंगा टाकाव्यात, नंतर भात घालावा. भात नीट हलवला की लगेच नारळाचा किस घालून हलवावे. नंतर गूळ मिसळावा.
४) भाताला दोन वाफा आणाव्यात.
५) वरून वेलदोड्याची पूड आणि काजूचे तुकडे घालावेत व गरम गरम ’गूळभात’ वाढावा.

तुम्ही कधी तिरूपतीला गेला आहात का? तिथे प्रसादाचा जो गूळभात मिळतो... अप्रतिम! तिथे भाविक देवाला वेगवेगळी घंगाळं बोलतात. जर कोणी गूळभाताचा प्रसाद दाखवला असेल तर ...घंघाळभर गूळभाताचा व्यंकटेशाला नैवेद्य दाखवतात. नेमके आपण तेव्हाच दर्शन घेऊन बाहेर पडत असू तर.... द्रोणात गूळभात मिळतो. असा गूळभात खाल्यावर पुन्हा देवदर्शनाच्या रांगेत उभं राहायचा मोह मला झाला होता.
समजा तुमच्यावेळी नसेल गूळभात तर निराश होऊ नका. दहीभात असेल किंवा तीळभात असेल, चित्रान्न असेल......... वा! .....जो प्रसाद असेल तो ! तुम्ही चाटून पुसून खाल याची खात्रीच!

4 comments:

  1. विद्या - मी आनंद नसून वैशाली आहे ह्याची नॊंद घेऊन मग प्रतिक्रिया वाच.......

    तू दिलेला गूळ भात अप्रतिम झाला होता. आम्ही त्याला नारळीभात म्हणतो. (जरी पूर्ण गुळात केला तरी.)

    सर्व डबा चाटून पुसून खाल्ला. त्यामुळेच तोंड खवळले. चित्राप्रमाणेच काजू सढळ हाताने होते. म्हणजे फक्त चित्रच आकर्षक करतात असे नाही ह्याचे प्रत्यंतर आले.


    वैशाली

    ReplyDelete
  2. तुम्ही कधी कुमार परीसरला गेला आहात का? तिथे प्रसादाचा जो गूळभात मिळतो... अप्रतिम! तिथे भाविक विद्या देवीला वेगवेगळी घंगाळं बोलतात. जर कोणी गूळभाताचा प्रसाद दाखवला असेल तर ...घंघाळभर गूळभाताचा व्यंकटेशाला नैवेद्य दाखवतात. नेमके आपण तेव्हाच त्यांच्या घरी जात असू तर.... द्रोणात गूळभात मिळतो. असा गूळभात खाल्यावर पुन्हा देवदर्शनाच्या रांगेत उभं राहायचा मोह आम्हा सर्वांना होवो.
    समजा तुमच्यावेळी नसेल गूळभात तर निराश होऊ नका. दहीभात ( खास विद्याताई स्पेशल) असेल किंवा तीळभात असेल ( जो आपण आजून खाल्ला नाही), चित्रान्न असेल ( त्याची चव तर आजूनही माझ्या जिभेवर ताजी आहे)......... वा! .....जो प्रसाद असेल तो ! तुम्ही चाटून पुसून खाल याची खात्रीच!असा प्रसाद आम्हा अवकाशवासीयांना रांगेत उभं न रहाता मिळो व विद्याताई आम्हालाही प्रसन्न होवोत . ही त्या व्यंकटेश्वराला आम्हा भाविकांकडून विनंती.

    ReplyDelete
  3. विद्या,
    मस्त! माझा आवडता पदार्थ. गुळाचा खमंगपणा काही औरच असतो.

    ReplyDelete
  4. मी आजच हि रेसिपी वाचतेय ...आणि आज प्रयत्न करणार बनवण्याचा ....हे देवा नारळ खवन कटकटीच काम आहे

    ReplyDelete