Friday, September 2, 2011

शाही फालुदा














साहित्य : रोझ सरबत, दुध, साय, सब्जाचे बी, जाड शेवया, बदाम, काजु, बेदाणे, व्हॅनिला आईस्क्रीम

कृती: प्रथम दुधात रोझ सरबत घालून थोडी साय टाकून मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे व थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. सब्जाचे बी पाण्यात भिजत घालावे. शेवया उकडून त्या थोड्या केशर पाण्यात भिजवून घ्याव्यात. बदाम व काजू किसून घ्यावेत.

ग्लास मध्ये फालुदा बनवताना पहिल्यांदा शेवया टाकाव्यात. त्यावर सब्जाचे बी टाकावे. नंतर त्यात अर्धा ग्लास भरेल इतका रोझ मिल्कशेक टाकावा. त्यावर किसलेले बदाम व काजु टाकावेत. त्यावर व्हॅनिला आईस्क्रिम टाकावे. वरुन पुन्हा रोझ मिल्कशेक टाकावा. वरुन थोडेसे रोझ सिरप आणि बेदाणे टाकून खायला (का प्यायला) द्यावे.

7 comments:

  1. काल रात्री खास कौस्तुभच्या हातचा हा फालुदा आम्हा सर्व मुद्गल परीवारासाठी........

    ReplyDelete
  2. ग्लास अर्धा रिकामा का ?

    ReplyDelete
  3. वा. आवकाशला तुझ्या हातच्या जेवणाच्या वेळच्या डिश चा सराव चालू आहे का ?

    ReplyDelete
  4. वरिल साहित्यातून बदाम, काजू, बेदाणे व साय वगळल्यास नुसता फालुदा बनतो.

    ReplyDelete