फोडणीचा शोध लावलेल्या माणसाबद्दल मला फार आदर आहे.
कढईत थोड तेल घ्याव. त्यात थोडी मोहोरी टाकावी. मोहोरी तडतडायला लागेली की मग जिरे, हिंग, हळद, तिखट टाकावं. जरुरीप्रमाणे मिरच्या, कढिलींब,कांदा टाकावा. मस्त फोडणी तयार. आता यात टाकत असलेल्या पदार्थांचा क्रम बदलला तर चवित फरक पडतो का? ते पहावे लागेल. पण कढईतली फोडणी, तव्यावरची फोडणी, लोखंडी पळीतली फोडणी यानी मात्र चवित फरक पडत असावा. आंबाड्याच्या भाजीला लोखंडी पळीतली फोडणी वरुन टाकल्याने काय झक्कास चव येते. फोडणीत हे वेगेवेगळे पदार्थ टाकताना काय मस्त आवाज येतात. फोडणी शिवाय पदार्थ याचा मी विचारच करु शकत नाही.
फोडणीचे हे मिश्रण शोधणारीला/ शोधणार्याला माझा साष्टांग नमस्कार....
सध्या कौस्तुभ रात्रीचे स्वत:साठीचे जेवण (भाकरीचा कुसकरा+इंद्रायणीचा भात फोडणीची ) स्वत:च्या हाताने बनवून खात आहे. व इतरांना आग्रहाने खाऊ घालत आहे. त्यामूळे फोडणीचे आवाज वैगरे सुचतंय त्याला.....त्याच्या हातचा हा फोडणीचा कुसकरा लई भारी!बदल हवाहवासा........
ReplyDelete