Thursday, October 27, 2011
चकली
साहित्य - तांदूळ -- ४ वाट्या, हरबरा दाळ -- २ वाट्या, उडदाची दाळ -- १ वाटी, धणे -- २ वाट्या, तिखट, मीठ, ओवा, तीळ, तळणीसाठी तेल आणि सोर्या.
चकली भाजणी --
तांदूळ, हरबरा दाळ, उडदाची दाळ आधी धुवून (दोन, तीन वेळ धुवून) पसरायचे, थोड्या वेळाने (ओल्या असतानाच) दोन्ही दाळी खमंग भाजायच्या, तांदूळ गरम होईपर्यंत भाजायचे. धणे भाजून घ्यायचे. जाडसर पीठ दळून आणायचे.
आठ वाट्या भाजणीचे पीठ घेतल्यास त्यात एक वाटी कढत तेल टाकायचे, चवीप्रमाणे तिखट, मीठ, तीळ आणि ओवा घालायचे. नंतर गार पाण्याने पीठ चांगले मळायचे. पंधरा/वीस मिनिटे भिजू द्यायचे. सोर्यात घालतानाही मळून घालायचे.
कागदावर चकली घालून घ्यायची. तेल कढत तापल्यावर गॅस कमी करून साधारण मध्यम आचेवर चकल्या रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या.
(चकलीच्या मधून नळी पडली असेल तर चकली खुसखुशीत होते.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment