Sunday, February 5, 2012





केक

साहित्य : दोन वाट्या मैदा, पावणेदोन वाट्या पिठी साखर, दीड टी स्पून बेकिंग पावडर, ३ अंडी, सहा टेबल स्पून लोणी, व्हॅनिला/आईस्क्रिम इसेन्स, अर्धा कप दूध. ज्याचा केक करायचा असेल ते साहित्य. उदा : चॉकलेट - बार, संत्र इ.

मैदा बेकिंग पावडर घालून ३ वेळा बारीक चाळणीतून चाळून घ्यावा. मिक्सरमधे अंडी फेटावी, मग पिठी साखर घालून फेटावे, मग लोणी घालून फेटावे. मिश्रण भांड्यात ओतावे. बेकिंग पावडर हळू हळू मिश्रणात टाकावी व सतत हलवावे. सगळे छान एकत्र करावे. त्यामधे एक झाकण इसेन्स टाकावा दूध घालावे. (जर चॉकलेट / संत्र चव हवी असल्यास ते घालावे. संत्र्यासाठी रस १ चमचा व साल फक्त केशरी भाग किसून घ्यावा. चॉकलेटची सॅब वितळवून घालावी). सगळे मिश्रण केक भांड्यात ओतावे. भाड्याला थोडे तूप लावावे म्हणजे केक चिकटत नाही. साधारण पाऊण तास ठेवावे. उलटा ताटलीत टाकावा. गार झाल्यावर तुकडे करावे. शक्यतो दुसर्या दिवशी खाल्यास अजून मुरतो.







6 comments:

  1. ह्या केकची वेशीतल्या लोकांना चव मिळण्याची शक्यता आहे. वेशीबाहेरी लोकांनी नाराज होऊ नये. त्यांची दखल पुढच्यावेळी घेतली जाईल.

    आशा तुझ्याबरोबर केक नक्की करेन.

    ReplyDelete
    Replies
    1. वैशाली,
      तुला केक आवडल्याची मेल केल्यावर वाटलं की कृती विचारायला हवी होती. पण अवकाश्ला येऊन पाहते तो काय कृती जिव्हाळ्यावर हजर! याला म्हणतात 'Perfectionist'.

      Delete
    2. वैशाली,
      धन्यवाद !! मला इतके दिवस वाटत होतं की केक बेक करण्यासाठी तू इलेक्ट्रिक ओव्हन वापरतेस. गॅस वर बेक करतेस हे आत्ताच कळले.
      आणि हो ...(केकच्या बाबतीत तरी)वेशीबाहेरील लोक अजिबात नाराज होणार नाहीत. कदाचित गुरुदक्षिणा म्हणून (फ़क्त)तुलाच वेशीबाहेरून केक पाठविला जाईल :)

      Delete
  2. >> शक्यतो दुसर्या दिवशी खाल्यास अजून मुरतो.
    उरला नाही तर काय करायचं??
    (देणारांनी उरण्याइतका दिला पाहिजे.)

    ReplyDelete
  3. विशेष टीप्पण्णी..... वैशालीने जे वाटीचे प्रमाण सांगितले आहे.ती वाटी वैशालीच्या घरातलीच लागते.म्हणजे त्यांच्या वाटीत मावतील एवढे तांदूळ आपल्याला मिळतात. ते तांदूळ आपल्या वाटीत घ्यायचे ते माप प्रमाण मानावे. आणि लोणी सान्यांचेच घेतले तर आणि तरच केक चांगला होईल.बरोबर ना वैशाली ?

    ReplyDelete
  4. आहाहा! तोंडाला पाणी सुटलं वैशालीमावशी!! खूप मस्त!

    ReplyDelete