Thursday, September 29, 2011
साठोरी
साहित्य -
सारणासाठी - १/२ किलो खवा, १/२ किलो बारीक रवा, १ किलो पिठीसाखर, १२ वेलदोडे.
पारीसाठी - ६ वाट्या बारीक रवा, ६ वाट्या मैदा, दीड वाटी तेल मोहनासाठी, मीठ, दूध.
तळण्यासाठी - १/२ किलो साजूक तूप
कृती - खवा खमंग भाजून घ्यावा. रवा कोरडाच भाजावा, रव्याचा रंग बदलू देऊ नये. गार झाल्यावर खवा, रवा, पिठीसाखर आणि वेलदोड्याची पूड एकत्र करून एका डब्यात घालून ठेवावे. हे सारण किमान एक दिवस मुरू द्यावे. ( दोन - तीन दिवसही चालेल.)
दुसर्या दिवशी रवा-मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेल घालावे. अर्धा चमचा मीठ घालून दुधात घट्ट भिजवावे. हे पीठ चार - पाच तास भिजू द्यावे.
करण्यापूर्वी मिक्सरमधून काढून मऊ करावे. गरज पडल्यास चमचाभर दूध घालावे. पारीसाठी लाट्या करून ठेवाव्यात.
सारणाचे त्याच आकाराचे लाडू करून ठेवावेत.
पारी जरा जाडसरच लाटावी . त्यात सारणाचा लाडू ठेऊन नीट बंद करावी. मग अधर लाटावी. अर्धा इंच जाडी उरेपर्यंत लाटावी.
अशा लाटलेल्या साटोर्या तव्यावर गुलाबीसर रंगात दोन्ही बाजूंनी भाजून घ्याव्यात. (तूप सोडायचं नाही.)
एकीकडे कढईत तूप तापवत ठेवावे. कडकडीत तापल्यावर गॅस कमी करावा.
मंद आचेवर भाजलेल्या साटोर्या तळून घ्याव्यात.
( एकवाटी (अर्धी वाटी रवा + अर्धी वाटी मैदा) पीठात मध्यम आकाराच्या साधारण पाच-सहा साटोर्या होतात.)
साटोर्या तुपाशी खातात.
( मिलिन्दकडे ”साठोरी" म्हणतात. आत साठा केलेला असतो म्हणून??
”साटोरी’ हा शब्द अधिक वापरला जातो. ’सांजोरी’ असंही म्हणतात.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
फोटो छान आहेत.
ReplyDeleteलेखी कृती आणि सचित्र कृती यांची सांगड घालणे सोपे जाईल.
मस्त!!
ReplyDeleteआता परत पेठचा खवा मागवावा लागेल :)
ज्येष्ठ मंडळींनी हा पदार्थ करावा व पुढच्या पिढीतल्यांनी खावा म्हणजे मस्त लागतो.
ReplyDeleteआता मात्र हद्द झाली. नको पाककृती, नको फोटो, लवकरी येऊ द्यात आमच्या द्वारी अश्या साटो-या विद्याताई.
ReplyDelete