
साहीत्य-बिर्याणीचा तांदूळ,मटार,फ्लॉवर,गाजर, श्रावणघेवडा,ढोबळी मिरची,बटाटा,कांदा,कोथिंबीर,पुदीना,मिरची,आलं,लसूण,गरम मसाला,तूप,मीठ,लवंगा,हीरवी वेलची,काजू.
कृती- प्रथम तांदूळ धूवून घेऊन तो तुपावर चार,पाच लवंदा व दोन तीन हीरवी वेलची घालून मोकळा शिजवून घ्यावा. तो पसरुन परातीत वेगळा गार करायला ठेवावा.पातेल्यात तूप घेऊन त्यात वरील सव भाज्या( कांदा सोडून ) बारीक चिरुन परताव्यात. पातेल्यावर झाकण थेवावे.भाज्या शिजत आल्यावर त्यात गरम मसाला,हीरवे वाटण( कोथिंबीर+मिरची+पुदीना+आलं+लसूण),मीठ घालून चांगले परतावे.दोन चमचे तूप सोडावे.नंतर हा गार झालेला मोकळा भात त्यात घालून एकत्र हलवावे.त्यावर कांदा (बारीक उभा चिरुन तेलावर तांबूस रंगावर परतलेला)पसरावा.व तूपावर परतून घेतलेले काजू घालावेत.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteवा!
ReplyDeleteबिर्याणी झाल्यावर ’सावकाश’ जेवावं!
धन्यवाद दीपा. नक्की करून बघेन.
ReplyDelete