Saturday, July 30, 2011

गोड दिवे


साहीत्य- कणीक, गूळ, पाणी
कृती-पाण्यात गूळ टाकून पाणी उकळवणे.व त्या गूळाच्या पाण्यात मावेल तेवढी कणीक घेऊन घट्ट भिजवणे. व त्याचे फोटोत दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे दिवे करुन घेऊन त्यांना चांगली वाफ आणावी. नंतर प्रत्येक दिव्यात भरेल एवढे तूप घालून गरम गरम खावेत.

Monday, July 25, 2011

मोदकाची आमटी

मोदकाच्या पारीसाठी साहीत्य- डाळीचे पीठ १ वाटी,तिखट, मीठ, हींग, हळद.डाळीच्या पीठात सांगितलेले साहीत्य घालून थोड्या पाण्यात तेलाचा हात लावून घट्ट गोळा करणे.
सारणासाठी-सुके खोबरे कीसलेले( सुक्या खोब-याची अर्धी वाटी),खसखस १ चमचा भाजून बारीक केलेली,तिखट-मीठ चवीप्रमाणे,बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर साखर.हे मिश्रण एकत्र करावे.
पारीसाठीचे भिजवलेले पीठ पुरीपेक्षाही निम्मी लाटी घेऊन त्याची उकडीचे मोदक भरुन घेतो तश्या पद्धतीने तयार सारण भरुन छोटे छोटे मोदक यार करुन घ्यावेत.
ग्रेव्हीसाठी-कांदा एक उभा चिरुन,खोबरे कीसलेले अर्धीवाटी,शेंगदाणे अर्धी वाटी, लसूण ५ ते ६ पाकळ्या, तीळ अर्धी वाटी.सर्व साहीत्य एकएक करुन तेलावर परतून घ्या. व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करा.
पातेल्यात फोडणीसाठी तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करा. नंतर ही वाटलेली पेस्ट चांगली परतून घ्या. नंतर त्यात आपल्याला हवे तेवढे सरसरीत होण्यासाठी पाणी घाला. त्यात मीठ तिखट चवीप्रमाणे घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हा रस्सा चांगला उकळल्यावर त्यात वरील मोदक सोडा. गॅस बारीक करुन ५ मिनीटे हे मोदक शिजू द्या.अशी मोदकाची आमटी, गरम गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा,आणि लसणाची ओली पाट्यावर वाटलेली चटणी अशी सर्व्ह करावी.

दुधी भोपळ्याची भाजी.


दुधी भोपळ्याची भाजी.
१)मूठभर हरभरा डाळ भिजत टाकावी.
२) दुधी भोपळ्याच्या चौकोनी फोडी कराव्यात.
३) कढईत फोडणी करुन, त्यात भिजलेली डाळ नि मिरच्यांचे तुकडे एकत्र परतावेत.
४) आता त्यात भोपळ्याच्या फोडी टाकाव्यात. परतुन झाकण ठेवावे. एक वाफ आल्यानंतर थोडेसे मीठ नि साखर टाकावी. भाजी शिजल्यावर तीत खोबरे, कोथिंबीर घालावी.

Sunday, July 24, 2011

टोमॅटो सूप















साहित्य - सहा टोमॅटो उकडून, साखर, मीठ, मिरपूड, खवलेला नारळ, लसूण, कांदा (उभा चिरुन), कोथिंबीर, बटर

प्रथम टोमॅटो कुकर कध्ये उकडून घ्यावेत. नंतर ते मिक्सर मध्ये फिरवून ते गॅसवर उकळायला ठेवावे. त्यात चवीप्रमाणे साखर मीठ आणि मिरपूड घालावी. खवलेला नारळ मिक्सर कध्ये बारिक करुन घालावा. थोडा लसूण घेउन त्याचे बारिक तुकडे करावेत. ते तेलावर गुलाबी रंगाचे होई पर्यंत परतून घ्यावेत व ते सूप मध्ये घालावेत. उभा चिरलेला कांदा तेलावर थोडासा डार्क ब्राउन कलरवर परतून घ्यावा. थोडासा जळाला तरी चालेल. सूपवर परतलेला कांदा आणि बटर घालून सर्व्ह करावे. तळलेल्या कांद्या ऐवजी तळलेले नुडल्स सुध्दा चालतील.

लिंबाचं सरबत

प्रमाण - एक ग्लासास - अर्धे लिंबू, ३ चमचे साखर, चविप्रमाणे मीठ, मिरपूड

अर्ध लिंबू ग्लास मध्ये पिळावं. मग त्यात ३ चमचे साखर, चविप्रमाणे मीठ आणि चिमूट्भर मिरपूड घालावी (जास्त घालू नये). पाणी घालून मिश्रण ढवळावं. मिरपूडीने सरबताला मस्त चव येते.

Saturday, July 23, 2011

पालक भाजी

पालक कढईत शिजवणे. (थोडा अर्धवट)
मिक्सर मधून बारीक करणे.
लोण्याची फोडणी करणे. (घरगुती अमूल नाही). त्यामधे मेथ्या टाकून वाटलेले पालक घालणे.
(फोडणीचे इतर साहित्या घालू नये)
सोबत आलं-लसूण पेस्ट, वाटलेली मिरची (तिखट जितके हवे तितकी), २-३ चमचे दही, चवीप्रमाणे मीठ घालून शिजवणे. पनीस असल्यास जरुर घालावे. (पनीर नुसते तुकडे टाकले किंवा आधी बटरवर परतून मग टाकले तरी चालतात.)
* नेहमीची भाजी खाऊन काहीवेळा कंटाळा येतॊ त्यामुळे अशी भाजी जरुर करुन पहावी.