Monday, November 28, 2011

डाएट कटलेट

साहीत्य-१/२ वाटी ओट्स,१/२ वाटी कणीक,आलं ,मिरची, लसूण पेस्ट,कोबी,गाजर,कांदा,ढोबळी मिरची कांद्याची पात
कृती- वरील सर्व भाज्या अगदी बारीक चिरुन घ्याव्यात.त्यात आलं,लसूण,मिरची ची पेस्ट घालावी,त्यात दोन्दी पीठ घालावीत व चवीप्रते मीठ घालून चांगले मळून त्याचे चपटे गोल करून घ्यावेत. नॉनस्टिक तव्यावर ते काही न घालता उलटे पालटे करावेत.व पुदीना आणि कोथिंबीरीच्या चटणीबरोबर खावेत.

Friday, November 25, 2011

व्हेज बिर्याणी


साहीत्य-बिर्याणीचा तांदूळ,मटार,फ्लॉवर,गाजर, श्रावणघेवडा,ढोबळी मिरची,बटाटा,कांदा,कोथिंबीर,पुदीना,मिरची,आलं,लसूण,गरम मसाला,तूप,मीठ,लवंगा,हीरवी वेलची,काजू.
कृती- प्रथम तांदूळ धूवून घेऊन तो तुपावर चार,पाच लवंदा व दोन तीन हीरवी वेलची घालून मोकळा शिजवून घ्यावा. तो पसरुन परातीत वेगळा गार करायला ठेवावा.पातेल्यात तूप घेऊन त्यात वरील सव भाज्या( कांदा सोडून ) बारीक चिरुन परताव्यात. पातेल्यावर झाकण थेवावे.भाज्या शिजत आल्यावर त्यात गरम मसाला,हीरवे वाटण( कोथिंबीर+मिरची+पुदीना+आलं+लसूण),मीठ घालून चांगले परतावे.दोन चमचे तूप सोडावे.नंतर हा गार झालेला मोकळा भात त्यात घालून एकत्र हलवावे.त्यावर कांदा (बारीक उभा चिरुन तेलावर तांबूस रंगावर परतलेला)पसरावा.व तूपावर परतून घेतलेले काजू घालावेत.