Sunday, August 14, 2011

गूळभात



साहित्य - १ वाटी तांदूळ, १ वाटी गूळ, १ वाटी नारळाचा किस, तीन चमचे साजूक तूप, दोन लवंगा, दोन चिमूट वेलदोड्याची पूड, १० काजू.
वेळ -३५  मिनिटे ,
किती जणांसाठी? - ४ ते ५ माणसांसाठी
कृती -
१) तांदूळ धुवून घ्यावेत, १ वाटी तांदळासाठी ( कोलम) १वाटी पाणी घालावे. कुकरमधे दुसर्‍या डब्यात नारळाचा किस ठेवावा. भात शिजवून घ्यावा.
२) भात ताटात/ परातीत काढून पसरवावा. त्यावर एक चमचा तूप घालावे.
३) कढईत दोन चमचे तूप घालावे. तूप कडकडीत झाल्यावर त्यात दोन लवंगा टाकाव्यात, नंतर भात घालावा. भात नीट हलवला की लगेच नारळाचा किस घालून हलवावे. नंतर गूळ मिसळावा.
४) भाताला दोन वाफा आणाव्यात.
५) वरून वेलदोड्याची पूड आणि काजूचे तुकडे घालावेत व गरम गरम ’गूळभात’ वाढावा.

तुम्ही कधी तिरूपतीला गेला आहात का? तिथे प्रसादाचा जो गूळभात मिळतो... अप्रतिम! तिथे भाविक देवाला वेगवेगळी घंगाळं बोलतात. जर कोणी गूळभाताचा प्रसाद दाखवला असेल तर ...घंघाळभर गूळभाताचा व्यंकटेशाला नैवेद्य दाखवतात. नेमके आपण तेव्हाच दर्शन घेऊन बाहेर पडत असू तर.... द्रोणात गूळभात मिळतो. असा गूळभात खाल्यावर पुन्हा देवदर्शनाच्या रांगेत उभं राहायचा मोह मला झाला होता.
समजा तुमच्यावेळी नसेल गूळभात तर निराश होऊ नका. दहीभात असेल किंवा तीळभात असेल, चित्रान्न असेल......... वा! .....जो प्रसाद असेल तो ! तुम्ही चाटून पुसून खाल याची खात्रीच!

Sunday, August 7, 2011

आईस्क्रीम विथ ब्रॅन्डी



साहित्य: व्हॅनिला आईस्कीम, ब्रॅन्डी

व्हॅनिला आईस्क्रीम वर एक चमचा ब्रॅन्डी टाकावी. ब्रॅन्डी च्या ऐवजी रम सुध्दा चालेल. खायला खूप भन्नाट लागते.

Friday, August 5, 2011

पम्पकिन ज्यूस (हॅरी पॉटर खासियत)



साहित्य: पाव किलो लाल भोपळा,
दोन तीन सफरचंदे आणि एक अननस (किंवा ’ट्रॉपिकाना’चा तयार पाईनॅपल आणि अ‍ॅपल ज्यूस : प्रत्येकी २०० मिली),
मध,
मिरपूड, जलजीरा किंवा चाट मसाला यापैकी जे आवडत असेल ते.
कृती:
भोपळा बारीक चिरून अथवा किसून घेऊन तो मिक्सरमधून काढावा. त्यात दोन भांडी पाणी घालून त्याचा रस गाळून घ्यावा. यात सफरचंद आणि अननसाचा रस मिसळावा (प्रत्येकी २०० मिली). यात चवीनुसार दोन किंवा तीन चमचे मध मिसळावा. आपल्या आवडीनुसार त्यात मिरपूड, जलजीरा किंवा चाट मसाला घालावा. (हे घातले नाही तरी पम्पकिन ज्यूस मिश्रण मस्त लागते.) हे सर्व मिश्रण नीट ढवळून घ्यावे
आणि प्यावे / प्यायला द्यावे

Wednesday, August 3, 2011

Mussels in White Wine and Garlic



serves 2

1-1/2 kilo mussels
3 T. parsley
sm. stalk of celery with leaves
1 medium onion
4-6 cloves of garlic
300 ml. white wine

If they are not already prepared, remove the 'beards' from the mussels by firmly pulling out and towards the hinge. Remove any barnacles growing on the shells with a small knife, or rub them firmly together under cold running water. Test any mussels that are open by tapping them. If they close, they are still fresh. If they do not, discard.

Chop the onion finely and mince the garlic. Sauté the onion and garlic for a few minutes. Add the wine and 2 T. of the parsley bring to the boil, drop in the mussels and give a good stir first before covering. Steam until they open (just a few minutes). Discard any that do not open.

Lift out with a skimmer and place in large deep plates (soup plates) and pour over the sauce. Sprinkle over the parsley before serving and serve with plenty of bread to soak up the delicious sauce or as the Belgians prefer, with a large serving of French Fried Potatoes!

Tuesday, August 2, 2011

कारल्याची भाजी

पाव किलो कारली, तेल- ६ टेबल स्पून, फोडणीच साहित्य, सुक खोबरं किसलेलं- पाऊण वाटी, दाण्याचा कुट - चार टेबल स्पून, मिरची, चिंचेचा कोळ/सॉस, गूळ, मीठ

कारली आयताकार तुकडे (छोटे) करुन चिरणे. (बिया काढून टाकणे). कढईमधे पाणी घेणे, त्यामधे हळद व मीठ टाकणे व कारल्याचे तुकडे टाकून ते उकळून घेणे. तुकडे बोटाने मोडले जातील इतपत शिजवणे. त्यानंतर चाळणीतून गाळणे व परत दाबून पाणी काढणे म्हणजे कडूपणा कमी येतो. फोडणी करणे, मिरची टाकणे - शिजवलेली कारली टाकणे - त्यावर तिखट पण टाकणे (रंग छान येतॊ) मीठ, सुक खोबरं, कुट, चिंच, गूळ टाकून भाजी परतावी. ती शिजलीच असते फक्त अजून खमंग करावी. भाजी तय्यार.

* इथे चिंच, गूळ, मीठ ह्याच्याप्रमाणाचा उल्लेख केला नाही कारण ते सर्वांना माहीत असेल असे ग्रुहित धरले आहे.
* एकंदरीतच मुबलक प्रमाणात तेल, खोबरं, कुट आहे ह्याचा विचार करता तब्येत आणि जिभेची चोचले ह्याची सांगड कशी घालायची आणि त्याची वारंवारिता किती ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.