Wednesday, July 23, 2014

कस्टर्ड कॅरॅमल

गेले अनेक दिवस ही पाकक्रीया करुन बघायचे मनात होते. अतिशय सोपी अशी ही पाकक्रीया आहे.

दोघांसाठी
साहित्य - दोन अंडी, पाव लिटर दुध, साखर, व्हॅनिला इसेन्स, ओव्हन

दुध मंद आचेवर उकळत ठेवावे. अंडी फोडुन त्याच ४-५ चमचे साखर घालून मिश्रण फेटून घ्यावे. मग या मिश्रणात थोडे उकळलेले दुध घालावे व दुध ओतताना मिश्रण हलवत रहावे. नंतर उरलेले दुध टाकावे व मिश्रण नीट एकजीव होई पर्यंत हलवावे.

नॉन स्टिक तव्यावर ४-५ चमचे साख्रर टाकून त्याल गॅसवर ठेवावे. त्यात १-२ चमचे पाणी घालावे व साखर लाकडी चमच्याने हलवत रहावी. साखरेचा पाक हा ब्राउन रंगाचा होई पर्यंत गॅसवर ठेवावे. नंतर हे कॅरॅमल थोडे इनॅमलच्या भांड्यात ओतून त्यावर अंडी आणि दुधाचे मिश्रण घालावे.

ओव्हनमधील ट्रे मधे थोडे पाणी घालून ही भांडी १८० तापमानावर १५ मिनिटे ठेवावीत. ओव्हन मधुन काढल्यावर १ तास फ्रीजमधे ठेउन खायला द्यावीत.

यातिल सर्वात महत्वाचा भाग महणजे कॅरॅमल तयार करणे हा आहे.

1 comment:

  1. >> यातिल सर्वात महत्वाचा भाग महणजे कॅरॅमल तयार करणे हा आहे.
    :)

    त्याहून महत्त्वाचा भाग म्हणजे सहकुटुंब , सहपरिवार, मित्रमंडळी, मैत्रिणमंडळासह आस्वाद घेणे.
    ते कधी ठरवलंय?

    ReplyDelete